“आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही”

0
195

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. या टीकेला शिवसेनेच्या महिला आघाडीने  प्रत्युत्तर दिलंय.

अमृता फडणवीस या काही भाजपच्या प्रवक्त्या नाहीत. जर त्या भाजपच्या नेत्या किंवा नगरसेवक सुद्धा असत्या तर आम्ही ऐकलं असतं. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये, असं विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड लपवायला जागा ठेवणार नाही. जर काही बालायचे असेलच तर आमच्या महिला आघाडी समोर येऊन बोलून दाखवावे, असंही विशाखा राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत. मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?, अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अशी टीका अमृता फडणवीसांनी केली होती.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थानवर 13 धावांनी मात

शिखर धवन व श्रेयस अय्यरची शानदार अर्धशतके; दिल्लीचे राजस्थानसमोर 162 धावांचे लक्ष्य

दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला पलटवार

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here