मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आसून संजय राठोड गायब असल्याच्या चर्चा सूरु झाल्या होत्या. यावर उपमुख्यमंत्री आजित पवार यांनी प्रतिक्रिया देत. संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.
संजय राठोड गायब नाहीत, ते आमच्या संपर्कात आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पूजाच्या वडिलांनीही सांगितलं आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार म्हणालेत.
महत्वाच्या घडामोडी –
लहान माझी बाहुली तिची मोठी सावली; पंकजा मुंडेचं प्रीतम मुंडेंच्या वाढदिनी खास ट्विट
पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का; 7 पैकी 6 जागा काँग्रेसच्या खिशात
‘लिव्ह इन’ म्हणजे शरीरसंबंधांचा परवाना नाही; चित्रा वाघ अबु आझमींवर कडाडल्या
‘भाजप बोलेल का यावर थोडं?’; रोहित पवारांचा भाजपला सवाल