“अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर”

0
177

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर झाला आहे.

1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रियाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सुटकेनंतर 10 दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने रियाला दिले आहेत.

ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर कोर्टाची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरु झाली होती. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन अर्ज मंजूर केला.

दरम्यान, रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळून लावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘त्या’ पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?; राम कदमांचा काॅंग्रेसला सवाल

अशा मुली बाजरीच्या शेतात मृतावस्थेत सापडतात; ‘या’ भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

हाथरस प्रकरणी नरेंद्र मोदी गप्प का?; योगी सरकारने काहीही दडवू नये- संजय राऊत

शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here