पुणे : मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसलं, खलनायक म्हणायचे. गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं, या गोष्टीचं दुःख कधीच व्यक्त केलं नाही”, असं म्हणत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे भावूक झाले.
माझी लायकी काढली गेली. पण जसजसं लोक माझं काम बघायला लागले धन्याचा धनंजय झाला, धनंजयचा धनू भाऊ झाला आणि आता धनू भाऊचा मंत्री महोदय झाला. शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीने सोबत असते. हे मी पाहिलं आणि अनुभवलं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
2014 ला धनंजय मुंडे जसा आला, लोकांनी आणि माध्यमांनी जे मांडलं तसं तुमचं मत झालं. यात मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. ते माझ्या नशिबात होतं, ते मी भोगलं. शेवटी स्वकर्तृत्वाने मिळालेलं कायम राहतं, अलगद मिळालेलं टिकत नाही”, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, पुण्यात स्थायिक झालेल्या परळीच्या नागरिकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी आभार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी-
“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”
‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा- सैफ अली खान
रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय
“उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”