मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, आता जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी
राज्यपालांना विमान नाकारणं हा दुर्दैवी प्रकार; ठाकरे सरकार इगो असलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस
राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरत राज्यपाल थेट राजभवनात
“कुख्यात गुंड अरूण गवळी कोरोना पाॅझिटिव्ह”
“धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप”