Home महाराष्ट्र राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरत राज्यपाल थेट राजभवनात

राज्यपालांच्या विमान प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरत राज्यपाल थेट राजभवनात

मुंबई : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.

आश्चर्य म्हणजे भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी तीक्ष्ण होताना दिसत आहे.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडमधील हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“कुख्यात गुंड अरूण गवळी कोरोना पाॅझिटिव्ह”

“धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप”

भाजपा नेते किरीट सोमय्यांना अलिबाग पोलिसांनी घेतलं ताब्यात

“गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”