Home महाराष्ट्र “गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”

“गिर गये तो भी टांग उपर, अशी चंद्रकांत पाटलांची अवस्था”

मुंबई :  सिंधुदुर्गातल्या वैभववाडीतले 6 नगरसेवक अमित शाहांच्या पायगुणानं गेले नाही. पण ते नगरसेवक गेले म्हणजे भाजपचं पुन्हा सरकार येणारच नाही, असं नाही. तर शाहांच्या पायगुणानं सरकार येणारच , असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरुन शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.

“गिर गये तो भी टांग उपर, असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं आहे. वैभववाडीत भाजप खासदार नारायण राणे पुरस्कृत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंटाळून हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत, असं विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, भविष्यात येणारी जी निवडणूक आहे या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडी ही स्वतःची प्रचंड ताकद दाखवून देईल”, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी 

मोठी बातमी! साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग 

एका वर्षात नेमकं काय बदललं?; हिंगणघाट प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचा सवाल

…त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे- देवेंद्र फडणवीस

“कल्याण ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपची युती”