सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, असं म्हणत बुडत्याला काडीचा आधार, अशी टीकाही विनायक राऊतांनी यावेळी केली.
नारायण राणे यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतलं. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे, आसंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ
वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी; आशिष शेलारांची ठाकरे सरकरवर टीका
फासा आम्हीच पलटणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…
“नारायण राणे 22 वर्षे ‘पुन्हा येईन’ची वाट बघतायत, फडणवीस 25 वर्षे बघतील”