मुंबई : मुंबईमध्ये शिवसेनेनं भाजपला अजून एक झटका दिला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सचिन तेंडुलकरने आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी- शरद पवार
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार असताना औरंगाबादचं संभाजीनगर का झालं नाही?- राज ठाकरे
अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता
अमित शहांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं- नारायण राणे