ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे- प्रविण दरेकर

0
206

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना ते ब्राह्मण असल्यानेच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जात आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनीच उच्च न्यायालयात लढून मराठा समाजाला आरक्षण दिलं. तरीही काही लोक पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या कुठल्यातरी नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट करतात ही वस्तूस्थिती आहे, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा समाजाला हे माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं आहे, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करत आहे का?- नितेश राणे

“मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू “

माझी जात ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातंय- देवेंद्र फडणवीस

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की, उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here