पुणे : भाजपने मला खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली, असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक, नेत्रतज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं होतं. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तात्याराव लहाने यांनी 4 भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तसेच तात्याराव लहाने यांना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारं नाही, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा समजू नये”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख-दु:खात नेहमी पाठीशी ठाम उभे राहिले”
“मोठी बातमी! वीज दरवाढीविरोधात भाजप ‘या’ दिवशी करणार महावितरण कार्यालयांसमोर आंदोलन”
…मग जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल