बीड : विधानसभेच्या निवडणुकीत ज्या शिलेदारांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना आमदार केले, त्याच शिलेदारांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे, भैय्यासाहेब मोरे यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. अर्धी आघाडी फुटली असून, आघाडीच्या 20 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली, तर आणखीही काही जण नाराज आहेत, अशी माहिती समोर अली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
बेळगावला केंद्रशासित राज्य करा; शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी
आता आम्ही त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?; अजित पवार संतापले
“2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प का?”
“शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?”