“मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत, त्यामुळे 2024 ला काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार”

0
462

सांगली : काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खाजगीकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाावागावात जाऊन मोदी सरकारचं पितळ उघड केलं पाहिजे, असा घणाघात नाना पटोले यांनी यावेळी केला. ते कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात आयोजीत काॅंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

काॅंग्रेसला देश वाचवण्यासाठी सत्तेत यायचं आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावं लागेल, तसेच पक्षाला 2024 च्या निवडणुकीत पुणे ताकदीने भाजपचा सामना करावा लागेल, असंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, देशाला दिशा देण्याचं काम पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात झालं आहे. नेहरूंनी देशाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची सार्वजनीक निर्मिती केली, पण त्या सर्व मोदी विकायला काढत आहेत. आपल्या उद्योगपती मित्रांच्या घश्यात देश घालण्याचं काम मोदी करत आहेत, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“गुलाबराव पाटील यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट, चर्चांना उधाण”

“India Vs England 5th Test! पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचं सावट, दोन्ही बोर्डांच्या संमतीने सामना रद्द”

प्रशांत किशोर यांच्या मदतीची मला कोणतीच गरज नाही- शरद पवार

“नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांना लुकआऊट नोटीस जारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here