मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना लिव्ह-इन पार्टनर करुणा शर्मांपासून त्यांच्यासोबत असलेले वाद मिटण्याच्या मार्गावर आहे.
धनंजय मुंडे आणि त्यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनीही वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले असून अटी आणि शर्तींची पूर्तता बाकी आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग आणि करुणा शर्मा यांचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती झाली असून दोघांनाही त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय
“हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”
सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आमच्या चुलत्यांमुळे लागली- अजित पवार
अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला