Home महाराष्ट्र “हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”

“हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत  यांनी आजच्या सामना अग्रलेखातून कर्नाटक सरकारवर निशाणा साधलाय.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणरावांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नको आहे. महाजन अहवालानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला भूभाग व त्याशिवाय कर्नाटकात जोरजबरदस्तीने कोंबलेला मराठी भाग, जो महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, तेवढाच तुकडा महाराष्ट्राला हवा आहे. बेळगावची लढाई त्यासाठीच सुरु आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, बाकी दोन राज्यांत कोणताही वादाचा विषय नाही. मुळात हे प्रकरण न्यायालयात पडून असताना बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, असंही राऊत यांनी अग्रलेखातून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आमच्या चुलत्यांमुळे लागली- अजित पवार

अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल