Home महाराष्ट्र अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे बैठक झाली होती. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल., असं या बैठकीत म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर

सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय

“हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”

सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आमच्या चुलत्यांमुळे लागली- अजित पवार