तुमच्या प्रार्थनेमुळे मी मरता मरता वाचले; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

0
13

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आता नवनीत राणा यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर नवनीत राणा यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये नवनीत राणा म्हणतात, गेले 5-6 दिवस अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास झाला. हा प्रवास फार कठीण होता. माझ्यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या त्या सर्वांचे आभार मानते. तुमच्या प्रार्थनेमुळे आज मी मरता मरता वाचले आहे. आता माझी तब्येत बरी असून चिंता करू नका. याच कारणासाठी मी हा व्हिडीयो शेअर करत आहे.

https://www.facebook.com/navneetkaurranaofficial/posts/2112299348915106

महत्वाच्या घडामोडी-

काँग्रेस आणि भाजपकडून मला ऑफर होती; कंगणा राणावतचं प्रत्युत्तर

“शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले”

भाजपकडून कोणीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही- देवेंद्र फडणवीस

आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये; राज्यापालांचा उपमुख्यमंत्र्यांना मिश्कीली टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here