आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार

0
162

अहमदनगर : भाजप खासदार नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते. त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये”, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.

नारायण राणे फायटर बटालियनमध्ये माझं नाव घ्यायचे. आता नारायण राणेंना मी वाईट कसा वाटायला लागलो?, असा सवाल करत मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही”, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर परिवाराचं सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील आज अहमदनगरला आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी-

..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा

“नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले, त्यामुळे पोपटासारखं बोलणारचं ना…”

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा

…सरकार आता तरी जागे होईल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here