जळगाव : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात कथित महिला अत्याचारप्रकरणी विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे. तसेच मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं म्हणत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
जळगाव जिल्हा शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात आज कोरोना लसीकरणाला आज गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्या प्रकरणाची कबुली स्वत: धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यांची या प्रकरणात कायदेशीर लढाई सुरू आहे. याचे विरोधक विनाकारण राजकारण करत आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असं मला वाटतं. तसेच ते या प्रकरणातून निर्दोष असल्याचं लवकरच सिद्ध करतील, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी-
लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”
पुलवामा हल्ला प्रकरणी अर्णब गोस्वामींचा संदर्भ देत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…
“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”