Home पुणे लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्यावरील गुन्हे गंभीर असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी दै.पुढारीला मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी कबूली देऊनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंडेबाबत नैतिकतेने निर्णय घ्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. अशा प्रकरणामध्ये अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे, असंही पाटील म्हणाले.

दरम्यान, भारतीय संस्कृती ही नितीमत्तेवर चालणारी आहे, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा द्यावा. तसेच लग्न न होता होणारी मुलं ही मानायची का?, त्याची नोंद प्रतिज्ञापत्रात करायची का?, असा टोला यावेळी चंद्रकांत पाटलांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

पुलवामा हल्ला प्रकरणी अर्णब गोस्वामींचा संदर्भ देत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”

“त्यावेळी धनंजय मुंडेंना शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी”