Home महाराष्ट्र पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघालेत- बाळासाहेब थोरात

पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेत, आता ते शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघालेत- बाळासाहेब थोरात

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता 50 दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं नागपूर येथे राजभवनला घेराव आंदोलन करण्यात आले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आपले पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेले आहेत व ते आता शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघाले आहेत. परंतु आपण त्यांचे गुलाम होणार नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क कायम ठेवणार आहोत व हे कायदे नष्ट करण्यास सरकारला भाग पाडणार आहोत., असं म्हणत थोरातांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, आमचा जो प्रस्ताव असेल, कायदा असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूचा असेल. आम्ही शेतकऱ्यांसाठी अगोदर काम करतो व नंतर बोलतो, असंही थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

पुलवामा हल्ला प्रकरणी अर्णब गोस्वामींचा संदर्भ देत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

“आता महाराष्ट्र-मुंबईतील देशी-ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”

“त्यावेळी धनंजय मुंडेंना शिवीगाळ करणारे मनीष धुरी आज त्यांच्या पाठीशी”