मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यावरून नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नवाब मलिक यांच्या जावयानं काही गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कशाच्या आधारे अटक केली आहे हे मला माहीत नाही. चौकशीतून सर्वकाही स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई होणार आहे, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, जावयाचं कुटुंब हे स्वतंत्र असतं. त्यामुळे जावयानं काही गुन्हा असेल तर सासऱ्याच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याचं कारण नाही, असंही पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल; राजीनामा देण्याची तयारी?”
राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही- प्रकाश आंबेडकर
माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे
धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडली आहे, मात्र…- शरद पवार