नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर शाई फेकण्यात आली. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला आहे.
सोमनाथ भारती सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र तिथे त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यावेळी मला अडवू नका, मला जाऊद्या, असं भारती पोलिसांना म्हणाले. मात्र पोलिसांनी त्यांना काही जाऊ दिलं नाही. त्यानंतर भारती यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तुझी नोकरी काढून घेतो, अशी दमदाटी केली. पोलीस आणि भारती यांच्यातील बातचीत वाढली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.
दरम्यान, शाई फेकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सोमनाथ भारती हे आक्रमक झाले होते. तेव्हा, योगी की मौत सुनिश्चित हैंस, असं वादग्रस्त वक्तव्य केलं.
Listen to AAP MLA Somnath Bharti carefully
He is clearly giving Death threats to UP CM.. @myogiadityanath
Request to @UPGovt to take action against these people.#SomnathBharti
— Rajeev Rajput (@TheRoyalRaajput) January 11, 2021
Shameless @AamAadmiParty MLA #SomnathBharti using derogatory language for #UP CM @myogiadityanath & goes on to say योगी की मौत निश्चित है
These words used for elected CM are condemnable
I demand immediate action against him by #AAP Chief #Delhi CM @ArvindKejriwal pic.twitter.com/pE8YcsC36S— Gautam Aggarwal (@gauaggbjp) January 11, 2021
महत्वाच्या घडामोडी-
सुरक्षा काढल्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही- देवेंद्र फडणवीस
“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”
हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य
राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी; शेलारांचा ठाकरेंना सवाल