देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असं भाजपाला वाटतं- सत्यजीत तांबे

0
157

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. दानवेंनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत, असं सत्यजीत तांबेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हिच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी, असंही सत्यजीत तांबे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कोरोना अपयश लपवण्यासाठी भाजपकडून पायाभरणीचा कार्यक्रम- बाळासाहेब थोरात

“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”

अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here