महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनी, ते पायात पाय घालून आपोआप पडतील- रावसाहेब दानवे

0
204

नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असं झालं आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या”

अयोध्येला जात असाल तर पेंग्विनसाठी AC ची सोय करून ठेवा, नाहीतर….; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर

.. तर कंगना रानौतने कलाविश्व सोडावं- करण जोहर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here