माझ्या मुलाने बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी

0
3401

मुंबई : जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून 7 मार्चला आयोध्येला जाणार आहेत. तर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आम्ही बाबरी मशीद बांधू, असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांचे सुपुत्र फरहान आझमी यांनी केलं आहे. मात्र अबू आझमी यांनी निषेध व्यक्त करत स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

फरहान आझमी माझा मुलगा असला तरी त्याचा आणि समाजवादी पक्षाचा काहीही संबंध नाही. बाबरी मशिदीबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णयचा सर्व मुस्लीम समाज आदर करतो. मी त्यांने केलेल्या बाबरी मशिदीबाबतच्या वक्तव्याचा निषेध करतो, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

याला धमकी समजा नाहीतर काहीही समजा पण मी खुप विनम्रतेने बोलत आहे. जर उद्धव ठाकरेॆनी आयोध्येचं टिकीट काडलं तर आम्ही चालत जाऊ, असा इशारा फरहान आझमी यांनी दिला आहे.

तुम्ही शिर्डी साईबाबांच्याबाबतीत जे वक्तव्य केला होता. तशी चेष्टा तुम्ही शिवाजी महाराजांसोबत का नाही करत, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कोल्हापूरात भर सभेत मुका घ्या मुका; नगरसेवकाचा स्थायी सभापतीला मुका

सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात

माझ्या भाषणाचे अर्थ- अनर्थ काढले जात आहेत; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

…म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here