Home महाराष्ट्र तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

अमरावती : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विचार जमत नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा, असा टोला नवनीत राणांनी यावेळी लगावला.

दरम्यान, घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”

अरे बापरे…मला भीती वाटतेय त्यांची; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये; शिवसेनेचा टोला

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”