Home पुणे “फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात”

“फडणवीस दुकान बंद होऊ नये म्हणून टीका करत असतात”

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, येरवडा कारागृहाबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, असंही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र

“शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”

केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर

2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार