मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून या संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक रोगांवर लस उपलब्ध करून दिल्या आहेत. आता ही संस्था कोरोना विषाणूवरील लसीचं संशोधन करत आहे. सायरन पुनावाला यांचं योगदान लक्षात घेता त्यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्युट च्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे असेच आहे., असं नांदगावकर म्हणाले.
असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती., असं बाळा नांदगावकरांनी ट्विट केलं आहे.
असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…; राम कदमांची टीका
“एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण?”
“17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”
सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका