खुषखबर! “कोरोनावरील पहिली लस भारतात तयार”

0
233

हैदराबाद : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशभरातील संशोधनकार्याला वेग आला आहे. कोरोना या विषाणूवरील देशात पहिली लस बनवण्यात भारताला यश आलं आहे.

हैदराबाद मधील ‘भारत बायोटेक’ कंपनीनं कोरोनावरील लस बनवल्याचा दावा केला आहे. या लसीची मानवी चाचणी घेण्याची परवानगी भारत बायोटेकला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूवरील देशातील ही पहिली लस ठरली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. हैदराबाद शहरातील एका सुरक्षित लॅबमध्ये ही लस बनवण्यात आली आहे.

दरम्यान, या लसीच्या चाचणीची सुरूवात जुलैपासून सुरू होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; TikTok, Helo सह 59 चिनी Mobile Apps वर बंदी

अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का?; फडणवीस म्हणाले….

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला; ‘या’ गोष्टी राहणार बंधनकारक

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा…; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here