मी बरा आहे, काळजी करू नका; धनंजय मुंडेचं समर्थकांना आवाहन

0
269

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे समर्थक उपवास करत आहेत. अशा समर्थकांना धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियाद्वारे आवाहन केले आहे.

मित्रांनो, मी बरा आहे, काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलं आहे.

दरम्यान, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला कसा बरा वाटेल? आपण सर्वांनी आहेत त्या ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे, एकमेकांची काळजी घ्यावी, हेच माझ्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचं काम करतील. अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांनी केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणाले…

“आईसाठी सुशांतने लिहिली होती अखेरची पोस्ट”

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमी ने एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला धक्का; म्हणाली…

सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here