मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या झाल्याचं पहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेक प्रश्नांना उत्तर देतानाच तुफान फटकेबाजी केल्याचे चित्र पहायला मिळालं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी अजित पवार यांना शेती करण्यासंदर्भातील त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली.
3 पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दु:ख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे 3 महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?, असं ट्विट करत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
३ पक्षाचे सरकार आले आणि हाता तोंडाचा घास गेल्याने दुःख झालंय असं आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही PC मध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता, बिन खात्याचे ३ महिने मंत्री राहण्याचा मान तुमचाच. तुम्ही इतके दुःखात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“भाजपचा झेंडा गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेण्यात चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा”
कुंडल्या बघणारे आता पुस्तकं वाचू लागले आहेत; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
मराठा तरुणांना आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे”