महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोल्हापूरात भाजपचे धनंजय महाडिक विजयी; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

0
346

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान झालं. या निवडणूकीत भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन तेल लावावं आणि…; राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंचा टोला

दरम्यान, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना 38 मतं मिळाली असून धनंजय महाडिकांना 41 मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंना न्यायालयाने पुन्हा धडा शिकवला; किरीट सोमय्यांची टीका

राज्यसभा निवडणूकीत MIM कुणाला पाठिंबा देणार?; शिवसेना की भाजपला?; इम्तियाज जलीलांनी जाहिर केलं, म्हणाले…

मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here