Home महाराष्ट्र मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठी दिग्दर्शक व मनसे नेते अभिजित पानसे यांनी 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी सचिन वाझे याची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अभिजित पानसे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात जाऊन सचिन वाझेची भेट घेतली. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच 100 कोटींच्या वसुली प्रकरणात नुकतीच सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयात केली होती. ही विनंती मान्य करत सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. त्यानंतर अभिजित पानसे यांनी घेतलेल्या सचिन वाझेच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

हे ही वाचा : …तर मनसेचं मत शिवसेनेला गेलं असतं; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

दरम्यान, अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तसेच अभिजित पानसे या वेब सीरिजमध्ये एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. मात्र सध्या रानबाजारमध्ये तिसऱ्या मालिकेमध्ये चारुदत्त मोकाशीने भूमिका साकारली असून या कथेला वेगळंच वळण मिळालं आहे. तसेच त्यानंतर आज अभिजित पानसे यांनी सचिन वाझेची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश

उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगणं म्हणजे…; मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर फडणवीसांचा पलटवार