Home महाराष्ट्र राज्यसभा निवडणूकीत MIM कुणाला पाठिंबा देणार?; शिवसेना की भाजपला?; इम्तियाज जलीलांनी जाहिर...

राज्यसभा निवडणूकीत MIM कुणाला पाठिंबा देणार?; शिवसेना की भाजपला?; इम्तियाज जलीलांनी जाहिर केलं, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे.

समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मविआला मतदान करण्याचं जाहीर केलं. मात्र, एमआयएमची मते कुणाच्या पारड्यात पडणार? असा प्रश्न होता. यावरून आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

“भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील., असं जलील म्हणाले.

धुळे आणि मालेगावमधील आमच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासासाठी आम्ही काही अटी घातल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावे अशी मागणी केली. तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्याचीही मागणी केली आहे. महाराष्ट्रातील आमच्या दोन आमदारांना काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करण्यास सांगण्यात आलं आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही जलील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मनसेचं मत शिवसेनेला गेलं असतं; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या माझिरेंची घरवापसी; माझिरेंची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश