मुंबई : मराठा आंदोलकाना घरात घुसून मारलं जातं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षातले नेते बेजबाबदार वक्तव्यं करत आहेत. या मुद्द्यावर त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही म्हणून उचलली जीभ की लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे., असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील हे फडणवीस सरकारच्या काळात नेमले गेले होते. ते अपयशी ठरले असे म्हणायचे असेल तर मग फडणवीस सरकारने क्षमता नसलेले वकील नेमले असे म्हणायचे का? पण आम्ही तसे राजकीय आरोप करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाही. सरकारच्या वकिलांनी अतिशय उत्तमपणे बाजू मांडली आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“भारताचे पहिले हिंदकेसरी काळाच्या पडद्याआड, कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन”
कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही- सुधीर मुनगंटीवार
ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे
“अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”