कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीपती खंचनाळे यांना लहानपणापासूनच शारीरिक कसरती आणि कुस्तीची आवड होती. याच आवडीतून त्यांनी बालवयातच कोल्हापुरातील शाहुपुरी तालीम गाठली आणि आपला कुस्तीचा सराव सुरु केला.
दरम्यान, 1950 पासून खंचनाळे यांनी कुस्तीला गांभीर्याने घेतलं आणि त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते विजयी झाले. 1959 मध्ये पंजाब केसरी बच्चा सिंग याला पराभूत करत श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावला आणि सगळ्या कुस्ती विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही- सुधीर मुनगंटीवार
ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे- निलेश राणे
“अभिनेत्री क्रिती सॅनोनचा नवा हाॅट ग्लॅमरस लूक पाहिलात?”
मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करणारं ठाकरे सरकार कंत्राटदारधार्जिणं- प्रवीण दरेकर