नवी दिल्ली : तेलंगणामधील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. यावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी एमआयएम मुख्यमंत्री केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का? असा सवाल ओवेसींना विचारण्यात आला. यावर ओवेसी यांनी, मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच, असं उत्तर दिलं.
तिहेरी तालक विधेयकावर टीआरएसने सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणं योग्य असेल का? असा प्रश्न ओवेसींना करण्यात आला, यावर ओवेसी म्हणाले की, तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न? तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू, असं ओवेसी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“मिरजेत तरूणाच्या डोक्यात दगड घालून निर्घूण खून”
“ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”
“चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला हवं”