Home महाराष्ट्र भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार

भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. यावरुन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

चंद्रकांत पाटील ज्या पदवीधर मतदार संघातून निवडून यायचे त्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला असून दशकांपासून भाजपचा उमेदवार निवडून येणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटात ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या सरकारने कार्य केले ,त्याला नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी दिलेली ही पावती आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेच्या 6 जागाही जिंकू, पुणे तर वनवेच’, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला- अरुण लाड

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी; भाजपचा पराभव

अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणं म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

“मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही”