Home महाराष्ट्र कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे

कदाचित भाजपला माझ्यापासून भीती वाटत असेल- आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर विरोधी पक्ष आणि भाजपकडून सतत टीका होत असते. आता यावर आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं असून टीकाकारांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यावर नेहमीच ते टीका करतात. मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे माझं टीकेवर लक्ष जात नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान, जिथंपर्यंत माझ्यावर वैयक्तिक टीका होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिला असेल तर त्यामध्ये मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. कारण त्यांनी गोल मारू नये म्हणून तसं केलेलं असतं. कदाचित त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल., असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेच्या महिला आघाडीच्या रणरागिणींचे अवमूल्यन- प्रविण दरेकर

उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंकडून खास शुभेच्छा

“सत्तेच्या स्वार्थासाठीच महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आलेत”

आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?- अतुल भातखळकर