खानापूरमध्ये पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास

0
577

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : येत्या 2024 च्या निवडणुकांमध्ये पुढचा खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केला. आळसंद येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर‌ आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली असून खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत 2024 चा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, असा निर्धार स्थानिक नेत्यांच्यावतीने करण्यात आला आहे . जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम होत आहे. तरुणांना वाव देण्याचे सर्वांनुमते ठरलं आहे, असं बाबासाहेब मुळीक म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं; फडणवीस म्हणतात…

पालघर जिल्हा परिषदेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंचे शिलेदार मैदानात

“…म्हणून मी फडणवीसांना म्हणालो होतो, काहीही करा, पण शरद पवारांचा नाद करू नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here