उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तरांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

0
667

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातील लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे, असं म्हणत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे

“एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर चिडलेले असताना एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाविकास आघाडी सरकारला तालिबाने म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या ती पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. आज महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही,” असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण”

राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत, त्यामुळे…; दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांची टीका

“72 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…”; मंत्री अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here