हे कुणाचे टूलकिट आहेत?, त्यांची एवढी हिंमत कशी झाली?; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या

0
199

मुंबई : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी देशवासियांना पतंजलीची औषधं आणि योग करून कोरोनावर मात करणं शक्य असल्याचा दावा केला आहे. तसेच अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं कोरोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत, असं रामदेव बाबा म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला गेला. आता यावर शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला माताेंडकर यांनी प्रतिक्रिया दिली. उर्मिला मातोंडकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत 24 तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?, असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी रामदेव बाबांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“रोहित जी, आपण सर्व मिळून या संकटात रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करूया, परंतु नियमांचे पालन करूनच”

…तर रोहित पवारांना कोव्हिड सेंटरमध्ये नाचायची परवानगी कशी?

“…हे घ्या अजून एक पोकळ आश्वासन, ठाकरे सरकार फक्त ज्योतिषीसारखे तारखा देत आहेत”

“इम्तियाज जलील ब्लॅकमेलिंगचं काम करतो, तो दुकाने उघडायला आला तर त्याला शिवसैनिक उत्तर देतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here