मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर आता शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
माननीय शरद पवार हे गेल्या 40 वर्षांपासून राजकीय दौरे करत आहेत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. शरद पवारांनी एकनाथ खडसेंच्या उत्तर महाराष्ट्रात दौरा केला तरी भाजपला काही फरक पडणार नाही, असं प्रसाद लाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ यांच्यात इतकीच ताकद होती तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत, असा सवाल करत
दरम्यान, भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झालाय. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे- नितेश राणे
आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; बीड अॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका
“नवनीत राणा आणि रवी राणा पोलिसांच्या ताब्यात”