“सत्ता गेल्यानं भाजप विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत”

0
139

मुंबई : भांडूप इथ एका मॉल मध्ये जिथ आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या ठिकाणी आग लागली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी भेट दिली. यावरुन शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी  देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिकडे पाहणी करायला गेले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. परंतु तिकडे जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणं. आगीची पाहणी करणं किंवा त्याची चौकशीची मागणी करणं हे आम्ही समजू शकतो. परंतु तिकडे जाऊन देखील महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेले राजकीय विषय हे देखील ते बोलायचे विसरले नाहीत, असं मनीषा कायंदे म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता गेल्यामुळे हे इतके विचलित झाले आहेत की मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला देखील ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेने भाजपचा खरा चेहरा ओळखलेला आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

श्रेयस अय्यर INJURY! ना रहाणे, ना अश्विन, ना स्मिथ; ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार

फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

“मोठी बातमी! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

पुण्यात लाॅकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत शाळा, काॅलेज बंद राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here