मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनावर निशाणा; म्हणतात…

0
402

मुंबई :  मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिला तर त्याचा मराठी आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सरकार बनवताना शिवसेनेनं आपली विचारधारा सोडून काय काय मॅनेज केलंय याची माहिती द्यायला हवी. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकतं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

दरम्यान, मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढून कायदा करु आणि निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ”

मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात- नारायण राणे

अमृता फडणवीस यांना आवरा; शिवसेनेचं भैय्याजी जोशी यांना पत्र

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here