Home महाराष्ट्र “बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”

“बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”

अमरावती:  देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलं आहे. असं म्हणत अनिल बोंडेंनी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कालपर्यंत राजद पुढे येईल, अशी चर्चा होती. मात्र, भाजप आणि जदयूला मतदारांनी स्वीकारलं आहे. काँग्रेस आणि राजदला जनतेने नाकारलं आहे, असं अनिल बोंडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांनी बिहार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात परिवर्तनाचे काम केलं. सर्व सामान्य जनतेने एनडीएला कौल दिला, असंही अनिल बोंडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे; निकालापूर्वीच भाजपच्या नेत्याकडून श्रेय

भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका, मोदींचा करिश्मा राहिला नाही- छगन भुजबळ

बिहारमध्ये एनडीए’चं जोरदार पुनरागमन, महागठबंधन पिछाडीवर

तेजस्वी यादवांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब वक्तव्य