Home महाराष्ट्र आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा…; चंद्रकांत...

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार न घेतल्यामुळे मराठा तरूणांचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. मात्र आता त्यांनी मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही आणि इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गांचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब आहे., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अकरावी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सर्वच प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरूणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र बिकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतंय., असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे., असं ट्विट करत त्यांनी ठाकरे सरकारवर इशारा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल- संजय राऊत

तज्ञांच्या समितीपेक्षा सचिन सावंत यांना जास्त अक्कल आहे का?- आशिष शेलार

“पंढरपूर-मुंबई आज मराठा आक्रोश मोर्चा”

… हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका