मुंबई : व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता व्हॉट्सऍपवरून पैसे पाठवता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयनं व्हॉट्सऍपला यासाठीची परवानगी दिली आहे.
विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून व्हॉट्स ऍप प्रायोगिक तत्वावर ही सुविधा देत आहे. मात्र त्याला एनपीसीआय ची परवानगी नसल्यानं, ती आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आली नव्हती. संपूर्ण भारतात आजच्या तारखेला तब्बल 40 कोटी जण व्हॉट्स ऍप वापरत आहेत. तर गुगल पेचे भारतात साडे सात कोटी आणि फोन पेचे 6 कोटी ग्राहक आहेत.
दरम्यान, या आधी गुगल पे, फोन पे आणि इतरही माध्यमांद्वारे पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात आता व्हॉट्सऍपची भर पडली आहे. यामुळे भारतातील डिजिटल पेमेंट पद्धतीला आणखी बळ मिळेल असा विश्वास जाणकारांकडून वर्तवला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई इंडियन्स फायनलमध्ये! बुम-बुम-बुमराची शानदार गोलंदाजी; मुंबईचा दिल्लीवर 57 धावांनी विजय
भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती- सतेज पाटील
दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार
Qualifier-1: दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय