मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारचा पोलीस राज तसंच पत्रकार आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचा केला जाणारा छळ निंदनिय आहे. जो एखाद्या नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणं, पत्रकारांना तुरूंगात टाकणं आणि आता अर्णब गोस्वामी यांना ज्या प्रकारे अटक केली, या सर्वांची ठाकरे सरकारला किंमत चुकवावी लागणार आहे, असं ट्विट करत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
हम ठाकरे सरकार के पुलिस राज, पत्रकार और सोशल मीडिया एक्टिविस्ट्स के उत्पीड़न की कड़ी निंदा करते है, जो नेवी के अधिकारी की पिटाई करते है, पत्रकारोंको जेल में भेजते है #ArnabGoswami अर्नब गोस्वामीको जिस प्रकार से गिरफ्तार किया ठाकरे सरकार को इसकी कीमत चुकानी पड़ेगी @BJP4India pic.twitter.com/xMTEHDha7X
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जे राज्य सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना अशाच प्रकारे अटक करण्यात येते- निलेश राणे
अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…